kimaya narayan
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सध्या प्राजक्ता बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. पण याबरोबरच तिचा टॅटूही चर्चेत आलाय.
प्राजक्ता माळी बरेच फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. पण सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तिच्या हातावर असलेल्या टॅटूने. या टॅटूचा अर्थ काय आहे आणि तिने नेमका का काढलाय जाणून घेऊया.
प्राजक्ताने ओशोंच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला. कॅलिग्राफी स्वरूपातील हा टॅटू आहे.
ओशो हे प्राजक्ताचे आध्यात्मिक गुरु आहेत. तिच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात ओशोंपासून झाली. म्हणूनच तिने तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा टॅटू काढला आहे.
या बरोबरच प्राजक्तावर इतर गुरूंचाही प्रभाव आहे. श्री श्री रविशंकर यांनाही ती गुरु मानते. त्यांच्या आश्रमभेटीचे ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते.
या शिवाय प्राजक्ता योगाभ्यास ही करते. तिने अष्टांग योगाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
प्राजक्ताचा फुलवंती सिनेमा यावर्षी रिलीज झाला. हा सिनेमा सुपरहिट झाला.