मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकने केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

प्रसाद ओक

नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता.

Prasad Oak

चित्रपटाशी स्पर्धा

यावेळी प्रसादला विचारलं की, मराठी चित्रपट हा हिंदी चित्रपटाशी स्पर्धा का करू शकत नाही?

Prasad Oak

छोटे चित्रपट

यावर पुढे प्रसाद म्हणाला “मुद्दा असा आहे, जे मराठीत छोटे चित्रपट आहेत, त्यांना चित्रपटगृह मिळताना खूप समस्या येत आहेत. ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. 

Prasad Oak

उघड सत्य

महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. याच्यासाठी भीक मागायची वेळ येता कामा नये. हे उघड सत्य आहे असंही यावर पुढे प्रसाद म्हणाला

Prasad Oak

मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी

पुढे प्रसाद म्हणाला, “पण ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. त्यांना हिंदीमध्ये जास्त कलेक्शन मिळत म्हणून प्राइम टाइमचे शो हिंदी चित्रपटांना दिले जातात. हा त्यांचा माज आहे

Prasad Oak

आशा व्यक्त

मी आशा करतो शिंदे सरकारच त्यांचा हा माज उतरवेल. काहींना काही तर तोडगा काढेल असं वाटतंय.अशी आशाही प्रसादने यावेळी व्यक्त केली

Prasad Oak

म्हणून रागिनी खन्नाने मागितली नेटकऱ्यांची माफी

Ragini Khanna | esakal