Anuradha Vipat
या पोस्टमध्ये प्रथमेशने लग्नानंतरची पत्नीसोबतची पहिली दिवाळी स्पेशल व्यक्तींसोबत सेलिब्रेट केल्याचं सांगितलं आहे.
प्रथमेशने आपल्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये प्रथमेश परबने लिहिलं आहे की, आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम स्पेशल असते. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून स्पेशल व्हायला हवी.
प्रथमेश परबने लिहिलं आहे की, आम्ही हा दिवस स्पेशल करण्याचा प्रयत्न केला. Sec Day school, खारदांडा येथील मुलांसोबत.
आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार त्यांच्या वागण्यातून दिसतो असं प्रथमेश परब आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे
आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजेत असं प्रथमेश म्हणाला.