झटपट बनवा घरच्याघरी झणझणीत कोळंबी पुलाव!

Aarti Badade

कोळंबी पुलावासाठी साहित्य

अर्धा किलो कोळंबी, २ कप तांदूळ, २ कांदे, १ टोमॅटो, काजू, पुदिना, कोथिंबीर, तूप, तेल आणि चवीनुसार मीठ घ्या.

Prawns

|

Sakal

सुगंधी मसाला तयार करा

धणेपूड, जिरेपूड, शहाजिरे, बडीशेप, वेलची, लवंग, दालचिनी आणि मेथी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Prawns rice 

|

Sakal

कोळंबीला मसाला लावा

स्वच्छ केलेल्या कोळंबीमध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट मिसळून १० मिनिटे ठेवा आणि नंतर तेलात ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.

Prawns

|

Sakal

हिरवी मसाल्याची पेस्ट बनवा

लसूण, आले, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Prawn

| Sakal

कांदा आणि मसाला परतून घ्या

तूप आणि तेलात बिर्याणीची पाने, शहाजिरे, कांदा आणि काजू परतून घ्या, त्यानंतर हिरवी पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा.

Prawn

| Sakal

कोळंबी आणि तांदूळ शिजवा

मसाल्यात परतलेली कोळंबी, हळद, तिखट, मीठ आणि तयार मसाला घालून दोन मिनिटे शिजवा, त्यानंतर भिजवलेले तांदूळ आणि पाणी घाला.

Prawn

| Sakal

गरमागरम कोळंबी पुलाव तयार!

झाकण ठेवून भात शिजवा आणि शेवटी मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे ठेवून गरमागरम कोळंबी पुलाव कांद्याच्या रायत्यासोबत सर्व्ह करा.