'त्या' वाईट अनुभवाबद्दल प्रियाने स्पष्टच सांगितलं

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री प्रिया बापट कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असते

प्रिया बापटने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तो अनुभव शेअर केला होता

२०१० मध्ये दादरमध्ये प्रियाच्या घरासमोरच्या गल्लीत ही घटना घडली होती

प्रिया शूट संपवून घरी परतत होती. तिच्या हातात पिशव्या होत्या आणि ती फोनवर बोलत होती

एक माणूस समोरून आला, त्याने माझे तिच्या छातीला वाईट पद्धतीने स्पर्श केला आणि तो पळून गेला

काय घडलंय हे समजायला तिला काही वेळ गेला. ती तिथे स्तब्ध उभी होती.

तिने मागे वळून पाहिलं तर तो इसम तिथे नव्हता, तो पळून गेला होता.

त्यानंतर तिने घरी आल्यानंतर तिच्या बाबांना ही घटना सांगितली होती