संतोष कानडे
पुण्यामध्ये पाच दिवस सुरू असलेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेची सांगता शुक्रवारी झाली.
ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मडग्वेने विजेतेपदावर मोहर उमटवली तर सांघिक विजेतेपद ली निंग स्टार संघाने पटकावले.
चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात श्नायर्को अॅलिक्सेई एक तास ५६ मिनिटे ५४ सेकंदांत ९५ किलोमीटरचे अंतर पार करत अव्वल आला.
हा ल्यूक मडग्वे आणि त्याचा ली निंग स्टार हा संघ प्रामुख्याने कार्बन फायबरपासून बनवलेल्या उच्च गुणवत्तेच्या सायकल वापरतो.
ल्यूक मडग्वेने वापरलेली सायकल पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवलेली होती. प्रोफेशनल रेसिंगमध्ये अशा मटेरियलचा वापर होतो.
या सायकल्स वजनाला अत्यंत कमी असतात. त्यांचं वजन केवळ सात ते आठ किलो इतकं असतं. वेगाच्या हिशोबाने सायकल्स डिझाईन केलेल्या असतात.
विशेषतः यात एरोडायनॅमिक डिझाईन असते. त्यामुळे ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत वेगात सायकल पळते.
अशा सायकल्सची किंमत दहा ते पंधरा लाखांपर्यंत असते. इलेक्ट्रॉनिक गिअर शिफ्टिंग, डिस्क ब्रेक्स असे फिचर्स सायकलमध्ये असतात.
या सायकलच्या टायरची क्वालिटीदेखील भिन्न असते. वेग आणि रस्ता धरुन ठेवण्यासाठी आवश्यक गुणवत्ता टायर मटेरियलमध्ये असते.