Sandip Kapde
पुणे शहरात मंगळवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली.
शहरातील अनेक भागांत पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली.
रस्ते आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
घरं आणि गाड्या पूर्णपणे पाण्यात अडकल्या.
महापालिकेच्या गटारसफाई कामाचा फज्जा उडाला आहे.
नाले व गटारांतील कचरा वेळेत न काढल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागले.
कोथरूड, कात्रज, वारजे, हडपसर, लोहगाव यांसारख्या भागांत मुसळधार पाऊस झाला.
टिळक रस्ता, सिंहगड रस्ता आणि स्वारगेट परिसरात मोठे पाणी साचले.
महापालिकेने गटार स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.
तरीदेखील चेंबर तुंबल्याने पाणी गटारात न जाता रस्त्यावरून वाहिले.
अनेक दुकाने आणि घरे पाण्याखाली गेली.
चांदणी चौकात तर पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळाली.
उड्डाणपुलाच्या कामादरम्यान नाले बुजवले गेल्याने पाणी साचले.
चांदणी चौकात दरवर्षी असाच धोका निर्माण होतो आहे
चांदणी चौकात वेळेवर उपाय न केल्यास जीवितहानी होऊ शकते
आंबिल ओढ्यामध्ये पाण्याची पातळी अचानक वाढली होती.
कात्रज परिसरात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली.
पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेची व्यवस्था अपुरी ठरली
माणिकबागेत ब्रह्मा हॉटेलजवळ नाल्याचे पाणी रस्त्यावर आले.
गेल्यावर्षी याच ठिकाणी मोठे नुकसान झाले होते.
नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने दुकानदार चिंतेत पडले.
रात्री आठच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळला
रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहत होते.
प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तारेवरची कसरत करत होती.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
शिवाजीनगर, औंध, बाणेरमध्ये कामाचा आढावा घेण्यात आला.
क्षेत्रीय कार्यालयांना यंत्रसामग्री तयार ठेवण्याचे आदेश दिले होते.
पावसामुळे कामकाजाची अंमलबजावणी करताना प्रशासन गोंधळले.
नागरिकांनी सोशल मीडियावर पाण्यात बुडालेल्या शहराचे फोटो शेअर केले.