Shubham Banubakode
पुण्यातील पार्वती टेकडीवरील मंदिर हे शहरातील सर्वात प्राचीन आणि सुंदर वारसा स्थळांपैकी एक आहे.
1749 मध्ये नाना साहेब पेशवे यांनी हे मंदिर बांधले. 1870 मध्ये काढलेली या मंदिराची छायाचित्रे आजही या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात.
नाना साहेब पेशवे, ज्यांना बाळाजी बाजीराव असेही म्हणतात, यांनी त्यांच्या आई काशीबाई यांच्या नवसापोटी हे मंदिर बांधले.
काशीबाई यांना पायाच्या आजारातून बरे झाल्यावर त्यांनी मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, जो नाना साहेबांनी पूर्ण केला.
पार्बती नावाने प्रसिद्ध असलेले हे मुख्य मंदिर काळ्या दगडात बांधले गेले आहे. यात शिव-पार्वती यांच्या मूर्ती आहेत. इथे पोहोचण्यासाठी 103 पायऱ्या चढाव्या लागतात.
पार्वती मंदिर हे त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाचे प्रतीक आहे. 1870 मधील छायाचित्रांमधून या मंदिराची तत्कालीन भव्यता आणि शांतता दिसून येते.
पार्वती टेकडी आणि मंदिर आजही पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.