Amit Ujagare (अमित उजागरे)
काही गावांची नावं ही मजेशीर असतात. पण त्या नावांमागे अनेकदा मोठा इतिहासही असतो, अनेकांना तो माहिती नसतो.
त्याप्रमाणं पिंपरी-चिंचवड शहराजवळ 'भोसरी' नावाचं एक गाव आहे. याच्या नावावरुन अनेकदा बाहेरगावच्या लोकांना ते आक्षेपार्ह वाटतं.
पण गावाला हे नाव देण्यामागचा इतिहासही मोठा आहे. याबाबतच आपण आज जाणून घेऊयात
भोसरी या गावाला ऐतिहासिक संदर्भ असल्याचं सांगितलं जातं. प्राचीन काळातही याचा उल्लेख आहे.
भोसरीला पूर्वी भोजापूर म्हणून ओळखलं जायचं कारण भोज राजाचा हा प्रदेश होता. त्यामुळं त्याच्या राज्याची ही राजधानी होती.
त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळातही भोसरीचा उल्लेख आढळतो, या तळाचा उपयोग सैनिकांची छावणी म्हणून केला जात असे.
फार पूर्वी भवसार समाजाचे लोकही या भागात मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला होते.
'भोसरी' हे नाव भोस किंवा भोज या विशिष्ट जमातीवरुन पडलं आहे. तर काहींच्या मते भावसार समाजाशी संबंधित हे नाव आहे.