Kiran Mahanavar
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी महाराष्ट्र पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
आरोपी मुलाचे वडील रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याला पोलिसांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली.
19 मे रोजी पहाटे पुण्यातील कल्याणीनगर भागात 17 वर्षीय मुलाने दुचाकीवरून जात असलेल्या एका मुलाला आणि मुलीला त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने उडवले, आणि दोघांचाही मृत्यू झाला.
त्या दिवसापासून पोर्शे कार सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
भारतीय अनेक सेलिब्रिटीज आणि क्रिकेटर यांच्याकडे ही पोर्शे गाडी आहे.
खेळाडूमध्ये सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, युझवेंद्र चहल कपिल देव यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरकडे Porsche 911 Turbo S आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 3.35 कोटी रुपये आहे.