सकाळ डिजिटल टीम
पुण्यात सारसबाग गणपती बाप्पाने घातला स्वेटर आणि टोपी.
गेले काही दिवस पुण्याचे तापमान चांगलेच घसरले असून थंडीचा कडाका वाढला आहे.
पुण्यातील नागरिकांचे श्रद्धेचे ठिकाण असलेल्या सारस बागेतील सिद्धिविनायक गणपतीला रिवाजाप्रमाणे थंडीसाठी लोकरीचा स्वेटर आणि लोकरीची टोपी असा पोशाख केला जात आहे.
गेली तीस वर्षे हि प्रथा पाळली जात आहे
रात्री बाप्पाला स्वेटर आणि टोपी चढविली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते.
सात दिवसांचे सात रंगाचे स्वेटर बाप्पासाठी तयार असतात.
रात्रीच्या थंडीत स्वेटर टोपी घालून सजलेले बाप्पाचे ध्यान पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
हे गणपती मंदिर २५० वर्षे जुनें असून नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले आहे. मंदिरात अतिशय सुरेख अशी संगमरवरी गणेश मूर्ती आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटी पर्यंत गणपती बाप्पाला स्वीटर आणि टोपी सायंकाळची घातली जाते.