सकाळ डिजिटल टीम
पुरण पोळी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि मानाचं स्थान असलेली पारंपारिक मिठाई आहे. परंतु, ते खरेतर मराठी पदार्थ नसून कर्नाटकी पदार्थ आहे.
पुरण पोळीला लागणारी हरभरा डाळ प्रामुख्याने कर्नाटकमध्ये पिकते, त्यामुळे पुरण पोळीचा जन्म कर्नाटकमध्ये झाला, असं सांगितलं जातं.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यापारी देवाणघेवाण आणि लोकांमधील संबंधामुळे पुरण पोळी महाराष्ट्रात पोहोचली.
कर्नाटकमध्ये १२ व्या शतकातील ‘मंसोलस्सा’ आणि १३व्या शतकात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथात पुरण पोळीचा उल्लेख आढळतो. तसेच, १४ व्या शतकात ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे.
१६व्या शतकात लिहिलेल्या ‘भावप्रकाश’ या ग्रंथात देखील गोड पोळीचा उल्लेख आहे.
पेशवेकाळातही पुरण पोळी बनवली जात होती, आणि हे पदार्थ भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला.
जरी पुरण पोळी कर्नाटकमधून आलेली असली तरी, महाराष्ट्रात तिने आपल्या स्थानाची प्रतिष्ठा मिळवली आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत पुरण पोळीचा प्रमुख स्थान आहे.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली पुरण पोळी जगभर प्रसिद्ध आहे आणि ती महाराष्ट्राची ओळख बनली आहे.