CSK vs RCB: जबरदस्त कॅच अन् तुफानी बॅटिंग, रचिन रविंद्रने गाजवलं IPL पदार्पण

प्रणाली कोद्रे

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला ६ विकेट्सने पराभूत केले.

CSK vs RCB | X/IPL

चेन्नईच्या या विजयात 24 वर्षीय न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्रनेही मोलाचा वाटा उचलला.

Rachin Ravindra - Ravindra Jadeja | X/ChennaiIPL

विशेष म्हणजे रचिनने या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

Rachin Ravindra | X/ChennaiIPL

त्याने या सामन्यात आधी क्षेत्ररक्षणात प्रभाव पाडला. त्याने आधी फाफ डू प्लेसिसचा जमीनीलगत एक अफलातून झेल घेतला. त्यानंतर विराटचाही झेल त्याने आणि अजिंक्य रहाणेने मिळून पूर्ण केला.

Rachin Ravindra | X/IPL

क्षेत्ररक्षणात प्रभाव पाडल्यानंतर रचिनने फलंदाजीतही त्याची छाप पाडली.

Rachin Ravindra | X/ChennaiIPL

त्याने आक्रमक खेळताना १५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.

Rachin Ravindra | X/ChennaiIPL

त्याने आधी कर्णधार ऋतुराजबरोबर सलामीला ३८ आणि नंतर रहाणेबरोबर ३३ धावांची भागीदारी केली.

Rachin Ravindra - Ajinkya Rahane | X/IPL

त्याच्या या खेळीमुळे त्याला इलेक्ट्रिक स्ट्रायकरचा पुरस्कारही देण्यात आला.

Rachin Ravindra | X/ChennaiIPL

CSK विरुद्ध हजार धावा करणारा विराट दुसराच क्रिकेटर

Virat Kohli | X/RCBTweet