Sandeep Shirguppe
माऊली धबधबा
माऊली धबधबा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा डोंगरदऱ्यात आहे.
पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या धबधब्यावर गर्दी तसेच वाहतुकीच्या रांगा देखील मोठ्या प्रमाणात असतात.
राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा चांगलाच वाहू लागलाय. कोल्हापूरपासून ५५ किमी अंतरावर हा धबधबा आहे.
कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यात सोनुर्ले गावाजवळ सोनुर्ले धबधबा आहे. येथे अनेक निसर्गप्रेमी आकर्षित होतात.
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड-आंबा मार्गावर असणारा मानोली धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीतील बर्की धबधबा हा वर्षा पर्यटनांचे प्रमुख केंद्र बनले आहे.
धुंदवडे धबधबा कोल्हापूरातील भुदरगड आणि गिरगाव या गावाच्या जवळ आहे.
अनेक धबधबे जोरदार पावसामुळे सतर्कतेसाठी बंद होतात, यासाठी अपडेट पाहूनचं पर्यटनासाठी बाहेर पडा.