राधिका मर्चंटच्या सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य आहे शास्त्रीय नृत्य...

Aishwarya Musale

राधिका मर्चंट

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.

Radhika Merchant | sakal

क्लासिकल इंडियन डान्सर

अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका खूप सुंदर आणि शिकलेली आहे. तिने 8 वर्षे भरतनाट्यमचा अभ्यास केला आहे आणि ती क्लासिकल इंडियन डान्सर आहे.

Radhika Merchant | sakal

फिटनेस

राधिकाच्या सौंदर्यात आणि फिटनेसमध्ये डान्सचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. शास्त्रीय नृत्याचा आरोग्याला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

Radhika Merchant | sakal

आरोग्याला फायदे होतात

भारतात शास्त्रीय नृत्याचे विविध प्रकार प्रचलित आहेत. यामध्ये भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी आणि मणिपुरी यांचा समावेश आहे. हे डान्स फॉर्म केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

classical dance | sakal

भरतनाट्यमच्या डान्स मूव्हमुळे शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक फायदे मिळतात. या नृत्यात प्रथम अरिमंडी पोजिशनमध्ये बसवले जाते.

classical dance | sakal

ही एक बसण्याची स्थिती आहे ज्यामध्ये स्क्वाटिंग पोजिशनमध्ये बसले जाते आणि शरीर सरळ ठेवले जाते. यामुळे शरीराचे पोषण सुधारते आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.

classical dance | sakal

यामुळे एक प्रकारचा कार्डिओ वर्कआउट होतो. त्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि रक्ताभिसरणही सुधारते. या नृत्यामुळे हाताची चरबी कमी होण्यासही मदत होते कारण यात हातांची खूप हालचाल होते.

classical dance | sakal

ओडिसी आणि कथ्थक नृत्य प्रकार देखील फिटनेस आणि स्नायूंना टोन करण्यासाठी चांगले आहेत. यामुळे शरीरात लवचिकताही वाढते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते आणि तुम्ही पोटाची चरबीही सहज कमी करू शकता.

classical dance | sakal

70 दिवसांत घटवलं 22 किलो वजन; यूट्यूबर अमित भडानाने सांगितली ट्रान्सफॉर्मेशन ट्रिक

amit bhadana | sakal