Puja Bonkile
आज लोकसभा 2024 च्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे.
राहून गांधी वायनाड आणि रायबरेली येथून उभे होते.
काँग्रेस नेता राहूल गांधी 2 लाखांनी आघाडीवर होते.
रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
सोनिया गांधी २००४ पासून याच मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत. पण, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी यावेळी माघार घेतली अन् राहुल गांधी यांना संधी दिली.
वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे के सुरेंद्रन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एनी राजा यांचे आव्हान होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी 2019 मधील सोनिया गांधी यांच्या 2,22,219 मताधिक्यापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवत विक्रम केला आहे.