Pranali Kodre
रायबागन सावित्रीबाई देशमुख हे नाव इतिहासात अनेकांनी ऐकले असेल. त्यांना रायबागन हा किताब का दिला गेला होता, हे जाणून घेऊ.
साधारण १७ व्या शतकात मुघल काळात नांदेडमधील माहूर येथे असलेल्या रामगड किल्ल्यावर उदाराम देशमुख यांना औरंगजेबाने सरदारपद दिलेलं होतं.
पण, उदाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सरदारपद त्यांची पत्नी सावित्रीबाई देशमुख यांनी सांभाळले होते.
त्यांनी समर्थपण हे सरदारपद भूषवताना बऱ्याच लढाया तलवार आणि भाला हातात घेऊन लढल्या.
१६५८ मध्ये दिल्लीच्या जवळील सामुगडच्या लढाईत सावित्रीबाईंनी आपला पुत्र जगजीवनरावला स्वत:च्या डोळ्यांसमोर मरताना पाहिले. त्याचवेळी त्यांनी हातात शस्त्र घेतली.
त्यांचा लढायांमधील पराक्रम पाहून औरंगजेबानं त्यांना 'रायबागन' हा किताब देऊ केला.
रायबागन याचा अर्थ कवी परमानंद यांनी सांगितल्यानुसार राजव्याघ्री आहे. त्यालाच मराठी व हिंदी या भाषांमध्ये रायबागन असं म्हटलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्धही सावित्रीबाई मुघलांकडून लढल्या होत्या. त्या सुरतमधील पहिल्याच स्वारीत शिवरायांच्या सेनेशी लढलेल्या.
सावत्रीबाई काही काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कैदेत देखील होत्या. मात्र, त्यांना नंतर मान आणि मनसब देऊन परत जाऊ दिले होते.
सावित्रीबाईंचा कालखंडा १६३२ ते १६९० दरम्यानचा असल्याचा म्हटलं जातं.
पंडिता रायबाघन (Pandita Raibaghan) (लेखिका - नयनतारा देसाई)