Sandip Kapde
राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं एकमेकापर्यंत एक ज्येष्ठ अभिनेत्री पोहचवत होत्या
मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली विशिष्ट छाप पाडून प्रेक्षकांचे अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे.
'बाईपण भारी देवा' या केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमातही त्या झळकल्या होत्या
हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला होता आणि सहा महिलांच्या आयुष्यातील कसरतीचं दर्शन त्यात घडवण्यात आलं होतं.
या दरम्यान त्यांच्या मुलाखतीमुळे राज ठाकरे यांच्याविषयी त्यांनी सांगितलेलं गुपित चर्चेत आलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं असल्यामुळे एकमेकांच्या घरी जाणं-येणंही नियमित होतं.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक महत्त्वाचा उलगडा केला की, त्यांनी चक्क राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं एकमेकांपर्यंत पोहोचवली होती.
शर्मिला आणि त्यांची मैत्री खूप आधीपासूनची होती. मोहन वाघ यांच्या अनेक नाटकांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या कन्या शर्मिला यांच्यासोबत त्यांची घनिष्ठ मैत्री झाली होती.
त्या म्हणाल्या, 'मी त्या दोघांची (राज आणि शर्मिला ठाकरे) प्रेमपत्रं पोहोचवली होती.'
मोहन वाघ यांची लेक शर्मिला या राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या आणि त्याद्वारे त्यांचा स्नेह अधिक दृढ होत गेला.
ही सर्व आठवण सांगणारी आणि राज-शर्मिला यांच्या प्रेमकथेचा महत्त्वाचा भाग असणारी अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते.