75 लाखांमध्ये अख्खं काश्मीर विकत घेणारा राजा; नेमकं काय घडलं होतं?

संतोष कानडे

काश्मीर

काश्मीरमध्ये एवढं सौंदर्य आहे की, या प्रदेशाला भारताच्या डोक्यावरचा कोहिनूर समजलं जातं.

सौंदर्य

मात्र काश्मीरच्या या सौंदर्याला शापीत म्हटलं जातं. त्याचं कारण तेथील हिंसाचार. आजही ही भीती कायम आहे, हे विशेष.

शाह मीर

तेराव्या शतकातील शाह मीर राजवटीपासूनचा काश्मीराचा हिंसेचा इतिहास आहे. शमशुद्दीन शाह मीर हा पहिला मुस्लिम शासक होता.

सांस्कृतिक केंद्र

शाह मीरच्या राजवटीपूर्वी काश्मीर हे एक सांस्कृतिक केंद्र होते. मुस्लिम, हिंदू, बौद्ध सर्वच समाजाचे लोक इथे गुण्यागोविंदाने रहायचे.

सिकंदर बुख्तसीन

शाह मीरचा मुलगा सिकंदर बुख्तसीन हा धर्मांध होता. त्यानेच काश्मीरमध्ये इस्लामिक कायदे लागू करण्यास सुरुवात केली. मंदिरे पाडली.

मुघल

सोळाव्या शतकामध्ये मुघल बादशहा अकबरने काश्मीर जिंकलं आणि काही काळासाठी तिथे शांतता प्रस्थापित झाली.

अफगाण

मुघलांच्या राजवटीनंतर अफगाणी लोकांची सत्ता १७५२ ते १८९९ या काळात होती. ६७ वर्षे जम्मू काश्मीरवर अफगाणी सत्ता होती.

अहमद शाह दुर्राणी

अहमद शाह दुर्राणीच्या काळात काबूल हेच काश्मीरवरील अधिकारांचे केंद्र होते. दुर्राणीची सत्ता फारकाळ टिकणार नाही, हे माहिती असल्याने अफगाणांनी काश्मीर लुटण्यास सुरुवात केली.

दहशत

या काळामध्ये काश्मीरची जनता कायम दहशतीखाली राहिली. काबुलकडून २६ शासक काश्मीरला पाठवले होते.

पंजाब

जुलुमातून मुक्त होण्यासाठी काश्मिरी जनतेने पंजाबचा महाराजा रणजीत सिंगकडे मदत मागितली. १८१४ मध्ये शिख सैन्याने काश्मीरवर आक्रमण केलं पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

श्रीनगर

बिरबल धर नावाच्या ब्राह्मणाने श्रीनगरवरुन पलायन करुन रणजित सिंगकडे पुन्हा मदतीची याचना केली. यावेळी पंजाबी सेनेने दिवाणचंद यांच्या नेतृत्वामध्ये १८१९ मध्ये अफगाणांना काश्मीरमधून हुकसावून लावलं.

पुढे रणजित सिंगाच्या शासकांनी काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला. शिखांच्या २७ वर्षांच्या राजवटीमध्ये काश्मीरने भयंकर अत्याचार सहन केले.

पुढे शिखाच्या दरबारातील वजील असलेला गुलाब सिंग याला जम्मूचा राजा बनवलं. गुलाबसिंग, ध्यानसिंग आणि सुचेतसिंग या डोग्रा बंधूनी साम्राज्य बळकट केलं. ते जम्मूतील राजपूत कुटुंबातील होते.

पुढे ब्रिटिशांसोबत गुलाबसिंगांचा तह झाला. यात रावी आणि संधू नद्यांमधील डोंगरा प्रदेश गुलाबसिंगकडे हस्तांतरित करण्यात आला.

त्यासाठी ब्रिटिशांना ७५ लाख रुपये देण्याची अट होती. हा भाग ब्रिटिशांना शिखांच्या लाहोर दरबाराने दिला होता.

अमृतसर करार म्हणून ओळखला जाणारा हा करार मूलतः बेकायदेशीर होता. कारण पैसे देऊन गुलाबसिंह हा राजा झाला होता. त्याने प्रजेवर जाचक कर लावले होते. ही राजवट शंभर वर्षे टिकली.