IPL 2024: दिल्लीच्या लखनौवरील विजयाने राजस्थानसाठी उघडले प्लेऑफचे दरवाजे

प्रणाली कोद्रे

दिल्ली कॅपिटल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 19 धावांनी विजय मिळवला.

Delhi Capitals | Sakal

राजस्थान रॉयल्सला फायदा

दिल्लीच्या या विजयाने राजस्थान रॉयल्सचा मोठा फायदा झाला आहे.

Rajasthan Royals | Sakal

प्लेऑफचे दरवाजे उघडले

दिल्लीने लखनौला पराभूत केल्याने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल 2024 प्लेऑफचे दरवाजे उघडले आहेत.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

दुसरा संघ

राजस्थान प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणारा कोलकाता नाईट रायडर्सनंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

Rajasthan Royals | Sakal

राजस्थानची कामगिरी

राजस्थान रॉयल्सने 14 मे पर्यंत 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकून 16 पाँइंट्स मिळवले आहेत. त्यांना 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

16 पाँइंट्स

दरम्यान, आता आयपीएल 2024 मध्ये 16 पाँइंट्सपर्यंत पोहण्याची संधी फक्त चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोनच संघांना आहे. त्यामुळेच राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले आहे.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

दोन जागांसाठी चुरस

पण आता प्लेऑफसाठी उरलेल्या 2 जागांसाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या पाच संघात चूरस आहे.

CSK vs RCB | MS Dhoni - Virat Kohli | X/IPL

IPL: फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल जडेजापूर्वी 'हे' दोन खेळाडूही झालेत बाद

Obstructing the field | Ravindra Jadeja | Sakal