Pranali Kodre
आत्तापर्यंत अनेक क्रीडापटूंच्या आयुष्यावर चित्रपट बनले आहेत. आता भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावरही लवकरच चित्रपट येणार आहे.
लव राजन यांच्या 'LUV FILMS' हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
तसेच विक्रमादित्य मोटवाने या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण करणार याची चर्चा होत आहे.
यासाठी आयुष्यमान खुराना आणि रणबीर कपूर यांची नावं चर्चेत होती.
मात्र आता एक नवी अपडेट समोर आली आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार राजकुमार राव या चित्रपटात गांगुलीची भूमिका साकारणार आहे.
तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.