सकाळ डिजिटल टीम
२०२५ च्या सुरुवातीला राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
राम चरण आता आपल्या पुढील चित्रपट ‘आरसी १६’च्या तयारीत व्यग्र आहेत.
‘आरसी १६’ मध्ये राम चरणसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एका अहवालानुसार रणबीर कपूरसुद्धा या चित्रपटात दिसणार असल्याचं चर्चेत आहे.
रणबीर कपूर या चित्रपटात पाच मिनिटांचा पॉवरफुल कॅमियो करणार असल्याचे बोलले जात आहे.
या चित्रपटात बॉबी देओल व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘आरसी १६’चे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी केले आहे.