गोष्ट राम नाईक, गोविंदा आणि दाऊदची...

आशुतोष मसगौंडे

लढत 2004 ची

2004 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या राम नाईक यांनी, गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मदत घेतल्याचा आरोप केला होता.

Ram Naik | Esakal

आरएसएस

गोविंदाने राजकारणात पुनरागमन केल्याने राम नाईक पुन्हा चर्चेच आले आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या राम नाईक यांनी लहानपणापासूनच आरएसएससोबत काम करण्यास सुरुवात केली.

Ram Naik | Esakal

जनसंघ

नाईक यांनी 1964 मध्ये भारतीय जनसंघातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1978 मध्ये बोरिवलीतून विधानसभा निवडणूक जिंकून सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले.

Ram Naik | Esakal

बेधडक

राम नाईक भारतीय राजकारणातील बेधडक नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात चार दशक घालवली. 2014 ते 2019 पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते.

Ram Naik | Esakal

संघटना

नाईक यांनी 1980 ते 1986 पर्यंत भाजपच्या मुंबई युनिटचे अध्यक्षपद भूषवले आणि त्यानंतर पक्षाने त्यांना महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष केले.

Ram Naik | Esakal

लोकसभा

1989 मध्ये राम नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 1991 आणि 1999 च्या निवडणुकीतही ते यशस्वी झाले.

Ram Naik | Esakal

पराभव

2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून अभिनेता गोविंदाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ज्याची त्यांना अजूनही खंत वाटते.

Ram Naik | Esakal

अबब! 'द ग्रेट इंडियन कपिल शो'सुनील ग्रोव्हरने आकारले एवढे मानधन

Sunil Grover | esakal
अधिक पाहाण्यासाठी...