साताऱ्याच्या आसनगाव-कुमठे परिसरात आढळला दुर्मिळ गुलाबी 'वारस'

सकाळ डिजिटल टीम

सातारा : आसनगाव- कुमठे (ता. सातारा) परिसरात दुर्मिळ असे वारस (Heterophragma Guadriloculare Tree) हे झाड आढळून आले. या झाडांवर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये फुले उमलतात व त्‍यांचा रंग नेहमी पांढरा असतो.

Heterophragma Guadriloculare Flower

आसनगाव-कुमठे परिसरात आढळलेल्‍या या झाडावर चक्क गुलाबी फुले उमलली असून, त्‍याची जपणूक करणे गरजेचे असल्‍याचे मत सागर कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केले आहे.

Heterophragma Guadriloculare Flower

निसर्ग भ्रमंती दरम्‍यान सागर कुलकर्णी यांच्‍या निदर्शनास हे झाड आले आहे. या झाडाची जपणूक करून तसे देशी वृक्षाच्‍या लागवडीसाठी याच्‍या बियांचा वापर करता येणे शक्‍य आहे.

Heterophragma Guadriloculare Flower

ही सुशोभीकरणासाठी उत्कृष्ट असून, त्‍याचा भविष्‍यातील पर्यावरण रक्षणासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, असे निरीक्षणही सागर कुलकर्णी यांनी नोंदवले आहे.

Heterophragma Guadriloculare Flower

जनुकांमधील बदलांमुळे फुलांच्या रंगद्रव्यांमध्ये बदल होऊन अशा प्रकारे फुले आल्याचे आढळून येते.

Heterophragma Guadriloculare Flower

जिल्‍ह्यात अशाच प्रकारची दुर्मिळ पिवळी काटेसावर, पांढरा पळस, पांढरा बुचपांगारा व काळा पळस ही झाडे असून, त्‍यांचेही संरक्षण होणे आवश्‍‍यक आहे.

Heterophragma Guadriloculare Flower

Jannat Zubair : अभिनेत्री जन्नत जुबेरनं 'या'बाबतीत किंग खानलाही मागं टाकलं