सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूरचं नाव घेतलं की आठवतं ते देवीचं माहेरघर आणि शौर्याचं प्रतीक. पण हे शहर केवळ धार्मिक नाही, तर ऐतिहासिकही आहे.
एकेकाळी कोल्हापूर शहर तटबंदीत होतं. ब्रिटिश काळात यालाच 'Kolhapur Fort' असं म्हटलं जाई. या तटाला सहा दरवाजे होते.
या सहा दरवाज्यांमध्ये रविवार वेस, शुक्रवार वेस हे महत्त्वाचे दरवाजे होते. आजही रविवार वेस बिंदू चौकात उभी आहे – इतिहासाची साक्ष देत.
ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट वॉडबाय यांनी 1858-59 मध्ये कोल्हापूरची अनेक चित्रं चितारली होती. त्यातून त्या काळचा कोट, वाडे आणि रस्ते आपल्या समोर जिवंत होतात.
पदमाळा तलावाजवळ महाराजांचा एक वाडा होता. आज तो अस्तित्वात नसला तरी वॉडबाय यांच्या चित्रांमुळे आपल्याला तो डोळ्यासमोर उभा राहतो.
पन्हाळ्याकडून कोल्हापुरात येताना असलेला 'ट्रॅव्हलर्स बंगला' म्हणजेच आजचा स्काऊट बंगला – त्या काळात प्रवाशांचं निवासस्थान होता.
1880च्या दशकात कोल्हापूरचं विस्तार व्हावं म्हणून तटबंदी उतरवण्यात आली. त्याचवेळी बरेच दरवाजे आणि भिंती नामशेष झाल्या.