Aarti Badade
सूर्य १५ जून २०२५ रोजी सकाळी ६:५२ वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे १२ वर्षांनंतर सूर्य आणि गुरूची प्रभावशाली युती होणार आहे.
सूर्य आणि गुरू एकत्र आल्यानंतर ‘गुरु-आदित्य योग’ तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो आणि करिअर व व्यवसायात यशाचे द्वार उघडतो.
गुरू आणि सूर्य हे दोघेही बुधाच्या राशीत — मिथुनमध्ये — एकत्र येत असल्याने ही युती अत्यंत शुभ परिणाम करणारी ठरणार आहे.
तूळ, कुंभ, धनु, मकर आणि मिथुन या पाच राशींना या युतीचा विशेष फायदा होणार असून, त्यांना करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील.
मिथुन राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश, प्रवासातून लाभ आणि आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीचे जातक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात, गुंतवणुकीतून नफा मिळवू शकतात आणि जुन्या अडचणींमधून सुटका होईल.
धनु आणि मकर राशींना व्यावसायिक यश, कौटुंबिक समाधान, आरोग्य सुधारणा आणि शासकीय कामकाजात यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, जबाबदाऱ्या वाढणं, वैवाहिक जीवनात सुधारणा आणि आरोग्यविषयी जागरूकता यांचा लाभ होईल.