राशी खन्नाने हैदराबादमध्ये घेतलं घर

सकाळ डिजिटल टीम

पॅन इंडियाची युवा स्टार राशी खन्ना हिने हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतलं आहे

तिच्या घराच्या पूजेचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे कुटुंब आणि मित्रांसह तिने हे हाऊसवॉर्मिंग केलं.

राशीने भारतीय पोशाखात हाऊसवॉर्मिंग करून सोशल मीडियावर त्याची एक झलक प्रेक्षकांना दिली

तिच्यासोबत तिची आई आणि काही जवळचे नातेवाईक आहेत, चाहते राशीचे कौतुक करत आहेत

नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर योद्धामध्ये ती चमकली होती

राशी खन्ना ‘द साबरमती रिपोर्ट’च्या रिलीजसाठी तयारी करत आहे

यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसते

तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील पाइपलाइनमध्ये आहे