सकाळ ऑनलाईन
छावा सिनेमात महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या हॉलिडे मूडमध्ये आहे.
नुकतेच तिनं सोशल मीडियावर सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रश्मिका आनंदी दिसतेय, याच भावना व्यक्त करणारी कॅप्शनही तिनं या फोटोंना दिलंय.
कॅप्शनमध्ये रश्मिका म्हणते, जीवन हे नेहमीच या फोटोंप्रमाणं आनंदी, तेजस्वी, खेळकर अन् मजेशीर असायला हवं.
विशेष म्हणजे रश्मिकानं या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून कपाळावर चंद्रकोराची बिंदी लावली आहे.
तसंच अंबाड्याला फुलांचा गजरा अन् कानात पारंपारिक वाटतील असे स्टायलिश आभुषणं घातली आहेत.
रश्मिकानं गळ्यात रुद्राक्षाप्रमाणं दिसणारं पेंडंट देखील लक्ष वेधून घेत आहे.
एखाद्या उंच इमारतीच्या किंवा हॉटेलच्या गॅलरीत तिनं हे फोटोशूट केलं आहे.