सूरज यादव
रतन टाटा यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग दान केलाय. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि टाटा एंडोमेंट ट्र्स्टला बहुतांश मालमत्ता देण्यात आलीय.
भाऊ जीमी नवल टाटा यांना जुहूच्या बंगल्याचा अर्धा भाग मिळेल. हा त्यांना वारसा हक्काने मिळाला होता. तर उर्वरित भाग सिमोन टाटा आणि नोएल टाटा यांना देण्यात येईल.
रतन टाटा यांनी जवळचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलीबागचा बंगला आणि २५ बोअर पिस्तुलसह तीनत बंदुका दिल्या आहेत.
रतन टाटा यांनी त्यांच्या मालमत्तेचा एक तृतियांश वाटा बहिणींना दिलाय. यात जवळपास ८०० कोटींचा समावेश आहे.
टाटा यांनी आणखी एक तृतियांश वाटा टाटा ग्रुपची माजी कर्मचारी असणाऱ्या मोहिनी एम दत्ता यांना दिलाय. मोहिनी या रतन टाटा यांच्या जवळच्या मानल्या जातात.
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पाळीव प्राण्यांसाठीही १२ लाखांचा निधी ठेवला आहे. दर तीन महिन्याला ३० हजार रुपये त्यांच्यासाठी खर्च होईल.
टाटांचा सहाय्यक शांतनु नायुडूला विद्यार्थी कर्ज माफ केलं तर शेजारी जेकला एमबीएसाठी दिलेलं २३ लाखांचं शैक्षणिक कर्ज माफ केलं.
रतन टाटा यांनी त्यांचा डोमेस्टिक हेल्पर आणि चालक राजन शॉ आणि त्याच्या कुटुंबासाठी ५० लाख रुपये दिले. तर एका हेल्परला ३० लाख रुपये दिले.