'एकमेव आवडता व्यक्ती', जड्डूकडून धोनीला बड्डेच्या हटके शुभेच्छा

प्रणाली कोद्रे

धोनीचा वाढदिवस

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी हा 7 जुलै रोजी 43 वर्षांचा झाला.

MS Dhoni | CSK | IPL | Sakal

शुभेच्छांचा वर्षाव

धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

जडेजाच्या हटके शुभेच्छा

धोनीचा माजी संघसहकारी आणि मित्र असलेल्या रविंद्र जडेजानेही हटके स्टाईलमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

पोस्ट

जडेजाने आयपीएल २०२३ स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला धोनीने उचलतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

आवडता व्यक्ती

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की 'क्रिकेटमधील माझ्या एकमेव आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी उपस्थिती हे सर्वोत्तम भेट आहे. खूप प्रेम.'

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

मोठा भाऊ

जडेजानं कॅप्शनमध्ये 'बिग ब्रदर' (मोठा भाऊ) असा हॅशटॅगही टाकला आहे.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

चाहत्यांचा प्रतिसाद

जडेजाच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. १३ लाखांहून अधिक लाईक्स या पोस्टला आल्या आहेत.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

T20 वर्ल्ड कपसह मायदेशात परतलेल्या टीम इंडियाचा 'विजयोत्सव'

Team India | Sakal