कच्च्या हळदीचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

हळद

स्वयंपाकघरात हमखास वापरली जाणारी हळद आपल्या सर्वांनाच माहित आहे. हळदीमुळे विविध खाद्यपदार्थांना चव मिळते.

Raw Turmeric Benefits

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण हळद ही फक्त आपल्या खाद्यपदार्थांची चव वाढवत नाही तर आरोग्यासााठी देखील हळद फायदेशीर आहे.

Raw Turmeric Benefits

कच्च्या हळदीमुळे अनेक आजारांवर नियंत्रित मिळवले जाऊ शकते. हळदीचे इतर अनेक फायदे आहेत.

Raw Turmeric Benefits

पोषकतत्वांनी परिपूर्ण

कच्च्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, अनेक आजारांचा धोका कमी होतो. रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

Raw Turmeric Benefits

हृदयासाठी फायदेशीर

कच्च्या हळदीमध्ये औषधी गुणधर्मांचे भरपूर प्रमाण आढळून येते. ज्यांना हृदयरोगाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी खाद्यपदार्थांमध्ये हळदीचा जरूर वापर करावा. त्यामुळे, हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

Raw Turmeric Benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कच्ची हळद ही अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे, हळदीचा वापर केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Raw Turmeric Benefits

पचनक्षमता सुधारते

कच्च्या हळदीच्या वापरामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते, आणि पचनक्षमता सुधारते.

Raw Turmeric Benefits

अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे

Anulom Vilom Pranayam