Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
तिने 'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
ती '१०० डेज', 'झिम्मा २' सारख्या चित्रपटात दिसली. आज रिंकूचा वाढदिवस आहे.
मराठीत बोललेलं कळत नाही? इंग्लिश मध्ये सांगू म्हणणारी प्रेक्षकांची लाडकी आर्ची किती वर्षांची झाली ठाऊक आहे का?
रिंकू फोटोंमध्ये आणि चित्रपटात मोठी दिसत असल्याने आणि तशाच भूमिका साकारत असल्याने ती अनेकांना मोठी वाटू शकते.
मात्र अभिनेत्री रिंकू राजगुरुचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला असून आज ती २४ वर्षांची झाली आहे
जेव्हा रिंकू १५ वर्षांची असताना सैराट चित्रपटात झळकली होती.
रिंकू एका चित्रपटासाठी २७ लाखांचं मानधन घेते.
तिची एकूण संपत्ती १५ ते ३० कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.
आज तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
रिंकूच्या आईनेही गोड फोटो शेअर करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
आता रिंकू पुढे कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ती लवकरच ललित प्रभाकरसोबत नव्या चित्रपटात दिसणार आहे.
DMart मध्ये सगळ्यात स्वस्त सामान कोणत्या दिवशी असतं? डीमार्टचे ग्राहक आहात मग हे वाचाच