30 कोटींचे घर, अनेक आलिशान गाड्या, जाणून घ्या हिटमॅन रोज किती कमावतो?

राहुल शेळके

आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयात हिटमॅन रोहित शर्माचे महत्त्वाचे योगदान होते

Rohit Sharma Net worth | Sakal

किती आहे कमाई?

रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानावर भरपूर धावा केल्या आहेत, तर कमाईच्या बाबतीतही त्याची कामगिरी दमदार आहे. आज तो सुमारे 215 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

Rohit Sharma Net worth | Sakal

दररोज किती आहे कमाई?

त्याच्याकडे 30 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे आणि त्याच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. क्रिकेटमधून तो दर महिन्याला सरासरी 2 कोटी रुपये कमावतो. म्हणजे दररोज 6 लाखांपेक्षा जास्त.

Rohit Sharma Net worth | Sakal

ग्रेड A प्लस श्रेणीतील खेळाडू

रोहित शर्मा हा बीसीसीआयच्या ग्रेड A प्लस श्रेणीतील खेळाडू आहे. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते. रोहित शर्माला क्रिकेट मॅच खेळण्यासाठीही खूप पैसे मिळतात.

Rohit Sharma Net worth | Sakal

कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये

त्याला कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये आणि एकदिवसीय आणि टी-20 खेळण्यासाठी अनुक्रमे 6 लाख आणि 3 लाख रुपये मिळतात.

Rohit Sharma Net worth | Sakal

मुंबई इंडियन्स

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.30 कोटी रुपयांना रिटेन केले आहे. त्याने आयपीएलमधून 178 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Rohit Sharma Net worth | Sakal

जाहिरातींमधून कमाई

रोहित शर्मा ड्रीम 11, Adidas, Nissan, Oppo आणि La Liga यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड सोबत त्याने करार केला आहे. जाहिरातींमधून त्याची वार्षिक कमाई 7 कोटी रुपये आहे.

Rohit Sharma Net worth | Sakal

अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक

रोहित शर्मानेही अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ सुमारे 90 कोटी रुपये आहे आणि त्यात Rapidobotics आणि Verroots सारख्या स्टार्टअपचा समावेश आहे. रोहित मुंबईत क्रिकेट अकादमीही चालवतो.

Rohit Sharma Net worth | Sakal

लक्झरी कारची आवड

हिटमॅनला लक्झरी कारची खूप आवड आहे. स्कोडा लॉरा, टोयोटा फॉर्च्युनर, BMWX3, मर्सिडीज GLS 400d, BMW M5 आणि Lamborghini Urus या त्याच्या मालकीच्या लक्झरी कार आहेत.

Rohit Sharma Net worth | Sakal

मुंबईत आलिशान घर

रोहित शर्माचे दक्षिण मुंबईत एक आलिशान घर आहे ज्याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. सहा वर्षे डेट केल्यानंतर रोहित शर्माने 2015 मध्ये रितिका सजदेहशी लग्न केले. दोघांचे लग्न मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झाले.

Rohit Sharma Net worth | Sakal
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोल्डन बॉल जिंकणारे ९ गोलंदाज; पाहा संपूर्ण यादी | Sakal
येथे क्लिक करा