Pranali Kodre
राजस्थान रॉयल्सने २८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
जयपूरमध्ये झालेला हा सामना १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गाजवला. त्याने शतकी खेळी करत सर्वांनाच चकीत केले.
वैभवची प्रतिभा पाहून त्याचे सध्या क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे.
वैभवने केवळ ३५ चेंडूत शतक केले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.
इतकंच नाही, तर आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला आहे.
त्याची खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माही भारावला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर वैभवचा फोटो पोस्ट करत त्याला 'क्लास' असे कॅप्शन दिले आहे.
वैभवने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली.