Rohit Sharma : प्रतिस्पर्धी, खेळपट्टी नाही तर रोहितच्या दृष्टीनं 'ही' गोष्ट महत्वाची

अनिरुद्ध संकपाळ

भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने विजयासाठी काय गरजेचं असतं हे सांगितलं.

रोहित म्हणाला की, प्रतिस्पर्धी किंवा खेळपट्टी महत्वाची नसते तर तुम्ही चांगल खेळणं विजयासाठी महत्वाचं असतं.

रोहित पाकिस्तानबद्दल बोलताना म्हणाला की, कोणतीच परिस्थिती बदलेली नाही. आम्ही सात महिन्यापूर्वीच त्यांच्याविरूद्ध आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये खेळलो आहे.

रोहितने सांगितले की आम्ही कठिण प्रसंगी चांगलं यश मिळवतो. त्यामुळं मला झालेली दुखापत दुय्यम असून संघ सर्वात आधी आहे.

न्यूयॉर्कमधील खेळपट्टीबद्दल रोहितने आपलं मत व्यक्त केलं तो म्हणतो की न्यूयॉर्कमधील परिस्थिती नक्कीच परिणाम करते.

मी परिस्थिती पाहून समतोल खेळण्याचा प्रयत्न करणार आहे.