Rose Day: 'हे' 5 प्रकारचे गुलाब देऊन करा प्रेम व्यक्त, पार्टनर होईल खुश

Anushka Tapshalkar

गुलाब दिवस

गुलाबाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा देखील याच प्रतीकाच्या दिवसाने सुरु होतो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करू शकता. पण फक्त लाल गुलाबच नाही तर 'या' गुलाबांनी सुद्धा तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.

Rose Day | sakal

लाल गुलाब

लाल गुलाब प्रेम, आकर्षण आणि आदराचे प्रतीक आहे. हे प्रामुख्याने एखाद्यावर असलेल्या सखोल प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी दिले जाते.

Red Rose | sakal

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब प्रशंसा, आभार आणि गोडवा दर्शवतो. आपल्या जोडीदाराबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

Pink Rose | sakal

पिवळा गुलाब

पिवळे गुलाब म्हणजे सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि मैत्रीची भावना. तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण साजरे करण्यासाठी पिवळा गुलाब अगदी योग्य निवड आहे.

Yellow Rose | sakal

पांढरा गुलाब

पांढरा गुलाब नवीन सुरुवात, निरागसपणा, शुद्धता आणि आदराचे प्रतीक आहे. कोणत्याही नात्यात नवीन सुरूवात करण्यासाठी तो उत्तम निवड आहे.

White Rose | sakal

पीच गुलाब

पीच गुलाब हे खरे प्रेम, आपुलकी आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. ज्या जोडप्यांना हा विशेष दिवस अधिक वैयक्तिक आणि जिव्हाळ्याच्या पद्धतीने साजरा करायचा आहे त्यांच्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे.

Peach Rose | sakal

बुके

तुमच्या प्रेमाच्या विविध रंगांना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या गुलाबांनी सजवलेला एक सुंदर बुके तयार करा. यामुळे तुमचा जोडीदार अतिशय खुश होईल.

Rose Bouquet | sakal

खास दिवस

तुमची तुमच्या जोडीदारासोबत जास्त काळापासून नात्यात असाल किंवा नवीन नात्याची सुरुवात करत असाल तर योग्य गुलाब निवडल्याने Rose Day चा आनंद द्विगुणित होईल.

Make Rose Day Special | sakal

फक्त गुलाबच नाही, तर 'ही' फुलं देऊनही तुम्ही करू शकता मुलींना हटके प्रपोज

Unique Flowers to Propose This Propose Day

|

sakal

आणखी वाचा