सूरज यादव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील नव्या कार्यालयाचं बुधवारी उद्घाटन झालं. केशवकुंज नाव असलेल्या या कार्यालयात आधुनिक सोयीसुविधा आहेत.
केशवकुंजची इमारत ५ लाख चौरस फूट परिसरात आहे. यात टॉवर, ऑडिटोरियम, ग्रंथालय, रुग्णालय आणि हनुमान मंदिर यांचा समावेश आहे.
आरएसएसच्या या नव्या कार्यालयासाठी दीडशे कोटी रुपये खर्च कऱण्यात आला. कार्यक्रम, प्रशिक्षण आणि बैठकांसाठी सोयीचं व्हावं यादृष्टीने ही इमारत उभारलीय.
संशोधनाच्या दृष्टीने ग्रंथालय, कार्यक्रमांसाठी ऑडिटोरियम, तर उपचारांसाठी रुग्णालयाची उभारणीसुद्धा या कार्यालयात केली आहे.
दिल्लीतल्या झंडेवाला परिसरात ४ एकरात पसरलेल्या या कार्यालयाच्या उभारणीसाठी १५० कोटींचा खर्च आलाय. भाजपच्या मुख्यालयापेक्षा ही इमारत मोठी आहे.
आरएसएसच्या नव्या मुख्यालयात तीन टॉवर आहेत. साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी यांची नावं आहेत. यात एकूण ३०० खोल्या आहेत.
साधना टॉवरमध्ये संघटनेचं कार्यालय आहे. इतर दोन निवास व्यवस्थेसाठी आहेत. मोकळ्या जागेत बाग असून आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांचा पुतळाही आहे.
केशवकुंज परिसरात १३५ कारच्या पार्किंगची सुविधा आहे. आऱएसएस कार्यकर्ते आणि संघाच्या लोकांनी या कार्यालयासाठी दान दिलं.
राजस्थान, गुजरातच्या वास्तुकलेनं सजवलेल्या या इमारतीला १००० ग्रेनाइट फ्रेम वापरल्या आहेत. यात लाकडाचा वापर कमी करण्यात आलाय.