सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात थंड राहणे आणि हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. चिया आणि सब्जा बी दोन सुपरफूड्स यामध्ये मदत करतात.
चिया बी Salvia hispanica या वनस्पतीपासून मिळतात. यांचा रंग काळा, पांढरट आणि राखाडी असतो आणि त्यांचा आकार लहान, अंडाकृती असतात.
सब्जा बी Ocimum basilicum या वेलच्या वनस्पतीपासून मिळतात. यांचा आकार गोल आणि रंग काळा असतो. ही बीजे मुख्यतः भारत आणि दक्षिण आशिया मध्ये उपलब्ध असतात.
100 ग्रॅम चिया बी मध्ये कॅलोरीज 58,प्रथिन 2 ग्रॅम,फायबर्स: 4 ग्रॅम,ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात व कॅल्शियम 76 मिलीग्राम असते.
सब्जा बियांच्या एका टेबलस्पूनमध्ये (13 ग्रॅम) मध्ये कॅलोरीज 57, प्रथिने 2 ग्रॅम,फायबर्स 7 ग्रॅम,कॅल्शियम 15% असते.
शरीराला हायड्रेटेड ठेवते,पचनसंस्थेसाठी चांगले असून ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स हृदयासाठी उपयुक्त असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
शरीराची उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त असते.पचनासाठी, अॅसिडिटी कमी करते, मधुमेह नियंत्रणात मदत करते. भुकेचे प्रमाण कमी करते, वजन कमी होण्यास मदत करते.
कच्चे खाऊ शकता किंवा पाणी/ज्यूसमध्ये मिसळा, स्मूदीमध्ये, चिया पुडिंग किंवा भाज्यांमध्येही वापरू शकता.
सब्जा बी भिजवून, ताजे लिंबू पाणी किंवा ज्यूसमध्ये घालता येतात. पारंपारिक डेसर्ट्समध्ये वापरता येतात, सॅलड किंवा दह्यात घालून खाता येतात.
सब्जा बी अधिक उष्णता कमी करणारे असून उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी उत्तम ठरतात. चिया सीड्सही विविध पोषणतत्त्वांनी भरपूर आहेत, पण सबजा बी उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरतात.