Monika Shinde
समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनात प्रभू रामचंद्रासोबतच हनुमानाचे अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांची भक्ती आणि आराधना प्रेरणादायी होती.
समर्थांनी १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर १६३२ ते १६४४ या १२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी भारतदर्शनास सुरुवात केली.
भारतदर्शनास निघण्यापूर्वी त्यांनी टाकळी गावात गोमयाचा पहिला मारुती स्थापन केला. ही स्थापना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती.
ते हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात गेले. आणि प्रवासात अनेक ठिकाणी त्यांनी मारुती मंदिरांची स्थापना केली.
इतकेच नव्हे, तर श्रीलंकेतही त्यांनी एक मारुती मंदिर स्थापन केले. आजही तिथे समर्थांनी रचलेली मारुतीची आरती रोज म्हटली जाते.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली अनेक मारुती मंदिरे आजही देशभरात पाहायला मिळतात. ही मंदिरे भक्तांसाठी श्रद्धेचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत.
समर्थ रामदास स्वामींचा हनुमान भक्तीचा मार्ग आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या स्थापनेची ही मंदिरे हीच त्यांची जिवंत ओळख आहेत.