संजय शिरसाटांकडे किती संपत्ती? पाच वर्षांत १३ पटींनी मालमत्ता वाढली

संतोष कानडे

व्हिट्स हॉटेल खरेदी

छत्रपती संभाजी नगर मधल्या व्हिट्स हॉटेल खरेदी प्रकरणामुळे संजय शिरसाटांच्या मालमत्तेची चर्चा सुरु झाली आहे. आता त्यांना आयकर विभागाची नोटीस आली.

बाजारमूल्य

व्हिट्स हॉटेलचं बाजारमूल्य ११० कोटी रुपये असताना शिरसाटांच्या मुलाने ते केवळ ६७ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला होता.

प्रतिज्ञापत्र

२०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या मालमत्तेमध्ये मागच्या पाच वर्षांत १३ टक्के वाढ झाली.

संजय शिरसाट

२०१९ मध्ये संजय शिरसाट यांच्याकडे जंगम संपत्ती १.२१ कोटी इतकी होती. २०२४ मध्ये जंगम संपत्ती १३.३७ कोटी झाली.

१९.६५ कोटी

२०१९ मध्ये स्थावर संपत्ती १.२४ कोटी इतकी होती. २०२४ मध्ये स्थावर संपत्ती १९.६५ कोटी इतकी झाली.

दागिने

संजय शिरसाट यांच्याकडे २०१९ मध्ये १६ कोटी रुपये किंमतीचे दागिने होते. आता २०२४ मध्ये त्यांच्याकडे १.१४२ कोटींचे दागिने आहेत.

मंत्री

महायुती सरकारमध्ये मंत्री असूनही संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीकांत शिंदे

त्यांच्यासह श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस मिळाली, असं खुद्द शिरसाट यांनी सांगितलं होतं. नंतर त्यांनी यू-टर्न घेतला.

भाजप

शिरसाट यांना धाडण्यात आलेल्या नोटिशीमागे राजकारण आहे का? भाजपची काही खेळी आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.