Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्च ते 3 जून दरम्यान पार पडली.
यंदाचा आयपीएलचा हा १८ वा हंगाम असणार होता. याआधी १७ हंगाम यशस्वीपणे पार पडले आहेत.
दरम्यान, पहिल्या तीन हंगामात विजेत्याला देण्यात येणारी ट्रॉफी वेगळी होती. पण आत्ता आपण जी सोनेरी रंगाची ट्रॉफी पाहातो, ती चौथ्या हंगामापासून देण्यात येते.
या ट्रॉफीवर एक संस्कृत श्लोक लिहिलेला आहे.
आयपीएलच्या ट्रॉफीवर लिहिले आहे की 'यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति'.
या संस्कृत श्लोकाचा मराठीत अर्थ होतो, जिथे प्रतिभेला संधी मिळते.
संस्कृतमध्ये लिहिलेला हा श्लोक आयपीएलचे बोधवाक्य आहे.