संतोष कानडे
पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, संतोष देशमुखांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. मारहाण इतकी क्रुरपणे करण्यात आली होती की त्यांचे संपूर्ण अंग काळे-निळे पडले होते.
नाकातून रक्त येईपर्यंत आणि पाईपणे केलेल्या मारहाणीत शरीरातील अनेक भागात रक्त गोठण्यापर्यंत निर्दयपणे ही मारहाण सुरू होती.
ज्या पाईपने त्यांना मारहाण केली त्या पाईपचे १५ तुकडे पोलिसांना मिळाले यावरून मारहाणीचा अंदाज येऊ शकतो. देशमुखांच्या छातीवर उजव्या व डाव्या बाजूला मारहाणीच्या जखमा होत्या, मारहाणीमुळे बरगडीवरही जखमा होत्या.
तसेच डाव्या खांद्यावर जबर मार लागला होता जखमांच्या खुणा अक्षरशः काळ्या-निळ्या झाल्या होत्या.
देशमुखांच्या हनुवटीवर, कपाळावर आणि दोन्ही गालावर जखमांच्या खुणा होत्या. तसेच दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला जखमा होत्या.
निर्घृण मारहाणीमुळे त्यांचा हात काळा-निळा पडलेला होता. तसेच त्यांच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती.
नाकातून बाहेर पडलेलं रक्त सुकलं होतं. छाती गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमांच्या खुणा होत्या.
पायाच्या पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नडगीवर मारहाणीच्या जखमा होत्या ज्या काळ्या-निळ्या पडल्या होत्या. पाठ तर संपूर्णपणे निळी पडल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय.
अत्यंत निर्घृणपणे वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुखांचा जीव घेतला. खंडणीतूनच ही हत्या झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे.
या प्रकरणात आणखी बी टीम असल्याचा आरोप होत असून पुरवणी चार्जशीटमध्ये इतरांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जवळचे असल्यानेच मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.