कराडच्या तीन 'आयफोन्स'मधला डेटा रिकव्हर; SIT ला काय सापडलं?

संतोष कानडे

वाल्मिक कराड

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड वापरत असलेल्या तीन मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे.

आयफोन

वाल्मिक कराडकडे तीन आयफोन्स होते. यामध्ये आयफोन १५ प्रो, १३ प्रो आणि आणखी एक १३ प्रो.

फॉरेन्सिक लॅब

फॉरेन्सिक लॅबमधून तिन्ही आयफोन्समधील डेटा रिकव्हर झाल्याचे चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.

डेटा

वाल्मिक कराडाने तिन्ही आयफोनमधील डेटा डिलिट केलेला होता. परंतु सुदैवाने तो रिकव्हर झाला आहे.

रिकव्हर

२५ ऑगस्ट २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंतचा डेटा एसआयटीने रिकव्हर करुन घेतला आहे.

एसआयटी

यादरम्यान कराड कुणाकुणाशी बोलला, काय बोलला, कुठे होता.. ही सगळी माहिती एसआयटीला मिळाली आहे.

धनंजय मुंडे

संतोष देशमुख यांच्या खुनापूर्वी आणि खुनानंतर वाल्मिकने धनंजय मुंडेंशी संपर्क केला होता का? याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे

चार्जशीट

अद्यापही संपूर्ण चार्जशीट पुढे आलेलं नाही. आणखी अनेक महत्त्वाचे धागेदोरे चार्जशीटमध्येच असल्याची माहिती आहे.

सुदर्शन घुले

सुदर्शन घुले जेव्हा जेव्हा आवादा कंपनीच्या प्रकल्पावर गेला, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी सर्व व्हिडीओ रेकॉर्ड केलेले आहेत.

खंडणी

त्यामुळे वाल्मिक कराड कशी खंडणी मागतो, कशा धमक्या देतो.. सगळे पुरावे एसआयटीला मिळालेले आहेत.