Sandip Kapde
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यात खळबळ उडवली होती.
या हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे
पोलिसांनी हत्येचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हस्तगत केले आहेत.
या फोटोमध्ये आरोपींचेही चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.
संतोष देशमुख यांना लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याचे यातून उघड झाले आहे
आरोपींनी अमानुष कृत्य करताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे समोर आले आहे.
जयराम चाटे व सुदर्शन घुलेने क्रूरतेचे सेल्फी काढल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
महेश केदारने जबरदस्तीने संतोष देशमुख यांना अपमानास्पद शब्द बोलण्यास भाग पाडले.
आरोपींनी देशमुख यांच्यावर अत्याचार करत असताना मजा घेतल्याचे भयावह दृश्य समोर आले आहे.
फोटो पाहिल्यावर हत्या किती क्रूर पद्धतीने झाली असेल, याचा अंदाज येतो.
संतोष देशमुख यांचा संपूर्ण चेहरा सुजलेला असून ते जमिनीवर पडलेले दिसत आहेत.
या अमानुष हत्येचे फोटो पाहून लोकांच्या मनाला पाझर फुटत आहे.