Apurva Kulkarni
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सारा अली खान ही महादेवाची मोठी भक्त आहे. ती नेहमीच सोशल मीडिया अकाउंटवर दर्शन घेतलेले फोटो पोस्ट करत असते.
दरम्यान साराने काही दिवसापूर्वी गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे.
साराने गुवाहटीतील ट्रीपमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने पोस्ट केलेले फोटो ब्रह्मपुत्रा नदीवरील रिव्हर क्रूझचे आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढरा कुर्ता, पायजमा आणि ओढणी घेतलेली आहे.
साराने फोटो पोस्ट करत एक कविताही लिहली आहे. 'जीवनाला स्वीकारा आणि स्वत:ला विकसित करा.' असं साराने पोस्टमध्ये लिहलय.
साराचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेकांनी तिच्यावर टीका करत म्हटलंय की, 'तु मुस्लिम आहेस, तु हे करू शकत नाही.'
तर काहींनी म्हटलय की, 'तु तुझं नाव बदल आणि सीता ठेव.' तर दुसऱ्याने म्हटलंय की, 'सारा तु तुझा धर्म बदलून टाक'