Shubham Banubakode
सारा तेंडुलकर आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वैदी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.
सिद्धांतने 'गली बॉय', 'नादानियां' आणि 'बंटी और बबली २' यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
सारा तेंडुलकर ही माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी आहे.
अलीकडेच सिद्धांत आणि सारा अनेकदा एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
यापूर्वी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या डेटिंगच्या अफवा होत्या. मात्र, त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने या नात्याचा शेवट झाल्याचं बोललं जातंय.
शुभमन गिलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारा तेंडुलकरसोबतच्या डेटिंगच्या अफवांना "हास्यास्पद" म्हटले होतं.
सिद्धांतचे नावही यापूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्याशी जोडलं गेलं होतं. पण आता दोघे वेगळे झाल्याची चर्चा आहे.
सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली, तरी सोशल मीडियावरील तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सिद्धांत सध्या 'धडक २' या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे.