Pranali Kodre
सारा तेंडुलकर ही दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांची कन्या.
सारा गेल्या काही वर्षात विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे.
आता साराने नुकतीच २६ मे २०२५ रोजी तिने सचिन आणि अंजली यांच्या लग्नाच्या ३० वा वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.
सचिन आणि अंजली यांनी २४ मे १९९५ रोजी लग्न केले होते.
त्यामुळे यावर्षी त्यांच्या लग्नाला ३० वर्षे झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशनही झाले.
ज्याचे फोटो साराने तिच्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. त्यात अंजली यांनी मेहंदी लावलेली दिसत आहे. तसेच सचिन आणि अंजली यांनी गळ्यात हार घातलेलेही दिसत आहेत.
याशिवाय देखील साराने त्यांचे काही जुने आणि लग्नातील फोटोही शेअर केले आहेत.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की 'या जोडप्याचे ३० वर्षांचे सेलीब्रेशन. एकत्र तुम्ही प्रेमाने आयुष्य घडवलं, ज्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते. हे नेहमीसाठी राहो.'