संभाजी महाराजांना पकडले तो सरदेसाई वाडा आता कसा दिसतो?

संतोष कानडे

छत्रपती संभाजी महाराज

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर तुळापूर येथे देह ठेवला. तुळापूरला आणण्यापूर्वी संभाजी राजांना बहादूर गडावर अर्थात आताच्या धर्मवीर गडावर नेण्यात आलेलं होतं.

फितुरी

मुळात ज्या ठिकाणी संभाजी महाराजांशी फितुरी झाली आणि गिरफ्तारीपूर्वीचा हल्ला झाला तोच हा सरदासाई वाडा. हा वाडा संगमेश्वर येथे आहे.

सरदेसाई वाडा

सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांवर पहिला हल्ला झाला. काहींच्या मते याच वाड्यात संभाजी महाराजांना मुकर्रबखानाने ताब्यात घेतलं. मात्र या सरदेसाई वाड्यातून एक-दीड किलोमीटर अंतरावर महाराजांची गिरफ्तारी झाली होती.

शिर्के

ऐतिहासिक माहितीनुसार, शिर्क्यांकडून वारंवार वतनाची मागणी होत होती. त्यातच कवी कलश हे संभाजी महाराजांच्या जवळ येत होते. श्रृंगारपूर येथे कवीकलश शिर्क्यांवर चालून गेले होते. कवीकलशांच्या मदतीला खुद्द संभाजी महाराज गेले. युद्ध जिंकून महाराज पन्हाळ्यावर पोहोचले.

पन्हाळा

छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळ्यावर असताना त्यांना एक खबर मिळाली. रायगडावर मुघलांचा हल्ला होण्याची शक्यता होती. हे कळताच महाराजांनी खेळनामार्गे संगमेश्वराची वाट धरली. लवकरात लवकर रायगडावर जाण्यासाठी ते निघाले होते.

संगमेश्वर

वाटेत महाराज संगमेश्वरावर थांबले होते. संगमेश्वरातल्या सरदेसाईंचा हाच तो वाडा. परिसराचं महसुली नियोजन या वाड्यातून चाले. मात्र महाराज संगमेश्वरात असल्याची बातमी शिर्केंमार्फत मुकर्रबखानाला देण्यात आल्याचं इतिहासकार सांगतात.

मुकर्रब खान

एका हेराने बातमी दिली मुकर्रबखान येतोय. मुकर्रब खान कोल्हापुरातून निघाला होता. त्याला पोहोचायला चार-पाच दिवस लागतील, अशी शक्यता होती. मात्र शिर्क्यांना वाट माहिती होती, त्यामुळे तो केवळ तीन दिवसात संगमेश्वरास पोहोचला.

नावडी बंदर

मुकर्रबखान जवळ आल्याचं महाराजांना लक्षात आल्यानंतर ते संगमेश्वरातल्या नावडी बंदराच्या दिशेने निघाले. पाण्याच्या मार्गाने निसटायचं, असं नियोजन होतं. संभाजी महाराजांच्या दिमतीला ५०० घोडेस्वार होते. तर मुर्करबखान दीड हजारांचं सैन्य घेऊन आला होता.

इकलास खान

इतिहासकार सांगतात, सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला झाला. महाराज वाड्यातून नावडी नदीच्या बंदरावर गेले. मात्र इकलास खानाने बंदराला वेढा टाकला होता. त्याने महाराजांवर झडप टाकली. या युद्धात मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले.

रायगड

युद्धादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांनी संताजी घोरपडेंना रायगडावर पाठवलं. इकडे संभाजी महाराजांना मुघलांनी वाऱ्याच्या वेगाने बहादूरगडावर नेलं. संसमेश्वर ते बहादूरगड हे अंतर केवळ दोन दिवसात कापलं.