Aarti Badade
पारंपरिक झणझणीत चव देणारे हे काळ्यावाटणातील चिकन संगळ्यानाच खूप आवडते. याचीच रेसिपी जाणून घेऊया.
चिकन, भाजलेलं खोबरं, लसूण, कांदा, हिरवी मिरची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल.
खोबरं, कांदा व लसूण काळसर होईपर्यंत भाजा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
तेलात कांदा परतून त्यात तयार मसाला पेस्ट, तिखट, हळद, मीठ आणि मिरची पेस्ट घालून परतून घ्या.
धुतलेलं चिकन घालून थोडं पाणी टाका. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
मसालेदार, झणझणीत काळा चिकन शिजल्यावर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
गरमागरम काळ चिकन तांदळाच्या किंवा ज्वारीचा भाकरीसोबत सर्व्ह करा.