Aarti Badade
फळांमध्ये असलेली जीवनसत्त्वं, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर तुमच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरतात. किडनी स्टोनपासून संरक्षण मिळतं.
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे किडनी स्टोन तयार होण्यापासून प्रतिबंध करतं. यामुळे वारंवार लघवी होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
बेरिजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. मूत्रमार्गाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवतात आणि किडनीच्या आरोग्यास पूरक असतात.
अननसात 'ब्रोमेलेन' नावाचं संयुग असतं, जे शरीरातील जळजळ कमी करतं आणि मूत्रपिंडाच्या कार्यास चालना देतं.
सफरचंदामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. यामुळे मूत्रपिंडांची साफसफाई होते आणि आजारांचा धोका कमी होतो.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन C आणि पोटॅशियम असते, जे किडनीचं कार्य सुधारतात आणि शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राखतात.
डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे सूज आणि इन्फ्लेमेशन कमी होतं आणि किडनी हेल्थ चांगली राहते.
पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. ही फळ किडनीचं संरक्षण करते आणि पचनसंस्थेला चालना देते.